दृष्टी आणि ध्येय

महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व/ कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.

Eiusmod Tempor

१) संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे. आणि त्यांचे समर्थन करणे.

Magni Dolores

२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.

Dolor Sitema

३) विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे.दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.

विभाग बद्दल

महाराष्ट्र शासनाचे महाशरद हे पोर्टल असे अभियान आहे की, समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून गरजू व होतकरु दिव्यांगांना सर्वतोपरी मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने या सर्व घटकांना एकाच मंचावर विनामूल्य आणण्यात येणार आहे. सदरचे अभियान टप्याटप्याने राबवण्यात येणार असल्याने यामध्ये पूर्णतः पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे. हे अभियान योग्य नोंदणीसह राज्यातील दिव्यांगं व्यक्तींना आवश्यक असणारी मदत मिळवून देण्याचा विनामूल्य मंच आहे. विविध प्रसिद्धी माध्यमातनू या पोर्टलचा योग्य प्रचार व प्रसार होणार असल्याने त्या माध्यमातनू राज्यातील अनेक घटक एकत्र येवून दिव्यांगांना मदत तथा सहकार्य करु शकतील.

सदर पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात. दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे.